सहस्त्रकुंड धबधबा हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध धबधब्यांपैकी एक आहे. हा धबधबा मराठवाडा आणि विदर्भ यांच्या सीमेवर, पैनगंगा नदीवर स्थित आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुका आणि नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुका यांच्या सीमेवर हा धबधबा आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील इस्लामपूर गावापासून साधारणता 5 किलोमीटर अंतरावर हा सहस्त्रकुंड धबधबा आहे. पैनगंगा नदीवरपरशुरामाने बाण मारून सहस्त्रकुंड धबधबा ची निर्मिती केली आहे असे या धबधब्या बद्दल बोलले जाते.
पावसाळ्यात हा धबधबा विशेषतः आकर्षक दिसतो आणि अनेक पर्यटकांना आकर्षित करतो. नदीचा प्रवाह एका मोठ्या खडकामुळे विभागला आहे, ज्यामुळे पाणी खाली कोसळताना दोन वेगवेगळ्या धारा तयार होतात. धबधब्याच्या काठावर पंचमुखी महादेव मंदिर आहे, जे भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
सहस्त्रकुंड धबधब्याच्या काठावर पर्यटकांसाठी बगीचा तयार करण्यात आला आहे, जिथे विविध रंगांची फुलपाखरे पर्यटकांना मोहिनी घालतात. पावसाळ्यात अनेक निसर्गप्रेमी भेट देण्यासाठी हा धबधबा पाहण्यासाठी पावसाळ्यात गर्दी करतात.